Pune Pimpri Chinchwad Crime News | कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, एकाला अटक; लष्कर परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लष्कर भागातील मॉडर्न डेअरीला सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्यांना वाट करुन देण्यासाठी पोलीस कर्मचारी लोकांना मागे सरकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी एकाने पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन कानशिलात लगावली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलीस शिपाई लोकेश दिलीप कदम Police Office Lokesh Dilip Kadam (वय-35) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून सुभान अब्दुल कादर सौदागर (वय-38 रा. भिमपुरा गल्ली नं. 9. कॅम्प पुणे) याच्यावर आयपीसी 353, 332 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.22) रात्री मॉडर्न डेअरी जवळ असलेल्या रेडिओ हॉटेल समोर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरातील मॉडर्न डेअरीमध्ये भीषण आग लागली होती.
त्यामुळे याठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. फिर्यादी व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक बनसुडे,
पोलीस शिपाई सागर हराळ व पोलीस नाईक मांजरे हे गर्दी कमी करुन अग्निशमन दलाच्या जवानांना व गाडीला वाट
करुन देत होते. पोलिसांकडून जमलेल्या लोकांना मागे सरकवण्याचा प्रयत्न केला जात होता.

फिर्यादी लोकेश कदम हे लोकांना मागे सरवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने ‘तुम्ही मला सांगणारे कोण’ असे
म्हणत वाद घातला. त्यावेळी कदम यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने कदम यांना
धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या कानाखाली दोन चापट मारुन फिर्य़ादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा
निर्माण केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.