Pune Pimpri Chinchwad Crime News | चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तुझ्या अंगावरील तिळ मोजतो असे म्हणत एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा चुलत्यानेच लैंगिक छळ (Sexual Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच याबाबत घरात सांगितले तर आई आणि तुला मारुन टाकू अशी धमकी पीडित मुलीला दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.23) स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन चुलता, चुलती व तीन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 354, 376, 506, 34 सह पोक्सो अॅक्ट कलम 8, 12, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 दरम्यान आरोपीच्या गुलटेकडी येथील घरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या चुलतीने मुलीला तिच्या घरी घेऊन गेली.
घरात त्या दोघी पत्ते खेळत असताना चुलत्याने व इतर आरोपींनी मुलीच्या अंगाला अश्लील स्पर्श करुन तिच्या स्त्री
मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यानंतर चुलत्याने मुलीला आतील खोलीत घेऊन गेला. त्याठिकाणी तुझ्या अंगावरील तिळ मोजतो असे म्हणत तिच्यासोबत अश्लील चाळे केले.

याबाबत आईला सांगितले तर आई व तुला मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली.
यामुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने याबाबत कुठे वाच्यता केली नाही.
अखेर मुलीने मंगळवारी स्वारगेट पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन सहा जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दसगुडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.