Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचा आमिष दाखवून एका युवतीवर बलात्कार (Pune Rape Case) करुन तिच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्या. तसेच आरोपीच्या पत्नीने युवतीला जातिवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या पत्नीवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यानेच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत बाणेर येथे राहणाऱ्या 32 वर्षीय युवतीने स्वारगेट पोलीस ठाण्यात रविवारी फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलीस उपनिरीक्षक युवराज वामन शिंदे (PSI Yuvraj Vaman Shinde) व त्याच्या पत्नीवर आयपीसी 376, 323, 504, 506, 34 सह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 10 जुलै 2023 ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत सातारा रोडवरील लॉज, मार्केट यार्ड परिसरातील हॉटेलमध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज शिंदे मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून
कार्यरत आहे. पीडित युवती आणि युवराज शिंदे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
युवराज शिंदे याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला.
तिच्यासोबत गोड बोलुन तिच्याकडुन महागड्या भेटवस्तु घेतल्या. तसेच तिला पुणे शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने तिच्यासोबत बोलणे टाळले.

आरोपी युवराज शिंदे याच्या पत्नीने पीडित युवतीला जातिवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच तिच्या अंगावर धावून जात मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत पीडित तरुणीने 3 जानेवारी
रोजी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे पोलिसांनी
हा गुन्हा स्वारगेट पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.