Pune Hadapsar Crime News | भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मांजरी परिसरातील प्रकार

Molestation Case

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – रस्त्याने जाणाऱ्या एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मीठी मारुन तिच्यासोबत अश्लील चाळे (Molestation Case) केल्याचा प्रकार मांजरी परिसरातील झेड कॉर्नर येथे शुक्रवारी (दि.5) रात्री आठच्या सुमारास घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Hadapsar Crime News)

याबाबत मांजरी परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी (दि.7) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून निरज हनुमानप्रसाद गुप्ता (रा. केशवनगर, जनसेवा बँकेसमोर, मुंढवा) याच्यावर आयपीसी 354ड, पोक्सो अॅक्ट 8 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी पीडित अल्पयीन मुलगी मांजरी येथील झे़ड कॉर्नर येथून जात होती.
त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन त्या ठिकाणी आला. त्याने मुलीला गडीवर बसण्यास सांगितले.
मात्र, तिने गाडीवर बसण्यास नकार दिला. आरोपीने गाडीवरून खाली उतरून तिचा हात पकडला.
तसेच भररस्त्यात तीला मीठी मारून तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केला. यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी दि.6) पीडित तरुणी सार्वजनिक रस्त्यावरुन जात असताना तिला आवाज देऊन तिचा पाठलाग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा