Pune PMC News | जाहिरातींच्या हक्कांच्या बदल्यात शौचालयांची देखभाल दुरूस्ती; प्रशासनाने घनकचरा विभागाचा प्रस्ताव रद्द केला

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune PMC News | शहरातील चार ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांवरील जाहिरातींच्या हक्कांच्या बदल्यात शौचालयांची देखभाल व दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. विशेष असे की, संबधित एजन्सीने सहा महिन्यांत करार न केल्याने हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे कारण देण्यात येत असले तरी या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने तो रद्द करण्यात आल्याची चर्चा महापालिका Pune Municipal Corporation (PMC) वर्तुळात आहे. (Pune PMC News)

शहरातील चार सार्वजनिक शौचालयांची प्रायोगीक तत्वावर देखभाल व दुरूस्तीचे काम पीपीपी तत्वावर खाजगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव घन कचरा विभागाने ठेवला होता. या बदल्यात संबधित संस्थेला १० वर्षांसाठी या शौचालयांवर व्यावसायीक जाहिरातींसोबत एटीएम आणि मोबाईल चार्जर पॉईंटचेही हक्क देण्यात येणार होते. यासाठी बी २ पद्धतीने निविदा मागविण्यात आली होती. त्यामध्ये मे. नेटवर्क मिडिया सोल्युशन या कंपनीची निविदा अधिक फायदेशीर होती. परंतू ही निविदा ६ महिन्यांच्या विहीत कालावधीत मान्य झाली नाही. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार निविदा स्वीकृतीच्या अंतिम दिनांकानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत मंजुर न झालेल्या निविदा रद्द करण्यात आली. तसेच ही निविदा दहा वर्षांंच्या कालावधीसाठी देण्यात येणार होती. लवकरच जाहिरात शुल्कात बदल होणार असल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने ती रद्द करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमुढे ठेवण्यात आला तो मान्य करण्यात आला. (Pune PMC News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.