Pune Pimpri Chinchwad Crime News | नववर्षाच्या मध्यरात्री गोव्यातील एक कोटींचे मद्य जप्त; बंगळुरु – मुंबई बाह्यवळण मार्गावर उत्पादन शुल्कची कारवाई

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | नववर्षाच्या (New Year) पार्श्वभूमीवर गोव्यातून राज्यात विक्रीसाठी आलेला एक कोटी रुपयांच्या मद्य साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) जप्त केला आहे. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ (Khed Shivapur Toll Plaza) ही कारवाई केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मद्य मोठ्या प्रमाणावर पुणे शहर परिसरात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाला मिळाली होती. ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर मद्य विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. बंगळुरु – मुंबई महामार्गावर (Bangalore – Mumbai Highway) खेड शिवापूर टोलनाक्याजवळ पथकाने संशयित ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये रंगाच्या डब्यांच्या मागे मद्याच्या बाटल्या सापडल्या.

 

तपासणीत मद्याची निर्मिती गोव्यात करण्यात आल्याचे दिसून आले. पथकाने ट्रकमधील एक हजार मद्याची खोकी जप्त केली. या कारवाईत ट्रक, तसेच मद्याच्या बाटल्या असा एक कोटी रुपयांचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi),
संचालक सुनील चव्हाण,
पुणे विभागाचे आयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंह रजपूत,
उपअधीक्षक संजय पाटील,
युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे आणि पथकाने ही कारवाई केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.