Pune Police MPDA Action | हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 76 वी स्थानबध्दतेची कारवाई

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MPDA Action | हडपसर पोलिस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार (Criminal On Pune Police Record) अभिषेक उर्फ नयन हरिदास भोसले Abhishek Alias Nayan Haridas Bhosale (19, रा. शेख जिवनबापू चाळ जवळ, स्मनाशभूमी रोड, शेवाळवाडी, पुणे) याच्यावर पोलिस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. त्याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात वर्षभरासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांची ही एमपीडीए कायद्याअंतर्गत केलेली 76 वी कारवाई आहे. (Pune Police MPDA Action)

अभिषेक उर्फ नयन हरिदास भोसले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाकु, लोखंडी कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह दुखापतीसह जबरी चोरी, खंडणी, दुखापत आणि हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्याविरूध्द 5 गंभीर गुन्हयांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे हडपसर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Police MPDA Action)

अभिषेक भोसले याला स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके
(Sr PI Ravindra Shelke) यांनी पाठविला होता. पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे
(Sr PI Chandrakant Bedare) यांनी प्राप्त प्रस्तावाच्या कागदपत्रांची पडताळणी केली आणि तो प्रस्ताव
पोलिस आयुक्तांकडे सादर केला. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी अभिषेक भोसले याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात वर्षभरासाठी स्थानबध्द केले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत एमपीडीए अंतर्गत 76 अट्टल गुन्हेगारांना स्थानबध्द केले आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.