Pune Pimpri Chinchwad Crime News | पार्किंगमध्ये खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, कोंढवा परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अर्पाटमेंटच्या सोसायटीत खेळत असलेल्या अल्पवयीन (Minor) मुलींना ‘अपार्टमेंटमधील बॉस कोण’ अशी विचारणा करुन दोन मुलींसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार हांडेवाडी रोडवरील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मंगळवारी (दि.26) घडला आहे. याप्रकरणी एका अनोळखी दुचाकीस्वार तरुणाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News )

याबाबत पीडित मुलीच्या आईने बुधवारी (दि.27) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन हिरो कंपनीच्या फॅशन प्रो (एमएच 12 3508) या दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध आयपीसी 354 सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दिराची अल्पवयीन मुलगी ख्रिसमस (Christmas) सणाची सुट्टी
असल्याने त्यांच्या घरी आली होती. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी व दिराची मुलगी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये खेळत होत्या. त्यावेळी एमएच 12 3508 या ब्ल्यु-ब्लॅक कलरच्या दुचाकीवरुन एकजण अपार्टमेंटमध्ये आला.

त्याने फिर्यादी यांच्या मुलीला ‘अपार्टमेंटमधील बॉस कोण आहे’ असे विचारण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील
चाळे केले. तर फिर्यादी यांच्या दिराच्या मुलीला जवळ ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन
विनयभंग केला. यानंतर आरोपी दुचाकीवरुन निघून गेला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एम. इनामदार (S.M. Inamdar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.