Pune Pimpri Chinchwad Crime News | नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सहकारनगर पोलिसांकडून अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पतंगाच्या नायलॉन मांजाची (Nylon Manja) विक्री करणे कायद्याने बंदी असताना त्याची विक्री करणाऱ्या एका तरुणाला सहकारनगर पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.27) दुपारी साडेचारच्या सुमारास धनकवडी येथील कॅफे पिटर हॉटेल (Cafe Peter Hotel) जवळील फुटपाथवर करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून नायलॉन मांजाचे 11 बंडल जप्त केले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

वेदांत राकेश गाढवे (वय-19 रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News) पुणे शहरात नववर्ष (New Year) आगमन व संक्रांत (Makar Sankranti) सणामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग आकाशात उडवले जातात. मात्र, त्यासाठी घातक असलेला नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरुन जाणाऱ्या नागरिकांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहे. काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. झाडांना मांजा अडकल्यामुळे पक्षांचे जीव धोक्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. मात्र, तरी देखील नायलॉन मांजाची चोरुन विक्री होत आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी दिले आहेत.

सहकारनगर पोलीस ठाण्यातील (Sahkarnagar Police Station) तपास पथक बुधवारी पेट्रोलींग करत असताना
पोलीस अंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली, धनकवडी येथील कॅफे पिटर हॉटेल जवळील फुटपाथवर एक
तरुण शासनाने बंदी घातलेला पतंगाचा नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी आला आहे.
पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपी वेदांत गाढवे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये मांजाचे बंडल आढळून आले.
पोलिसांनी आरोपीकडून 4 हजार 400 रुपयांचे 11 नायलॉन मांजाचे बंडल जप्त केले.
आरोपीवर सहकारनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 188, 336 सह पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत
(Environment Protection Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील
(IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Sr. PI Surendra Malale),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने (PI Sandeep Deshmane) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे
(Rahul Khandale) पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड,
पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, भुजंग इंगळे, नलेश शिवतरे, सुशांत फरांदे, सागर सुतकर,
बजरंग पवार, नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.