Satara Dhom Dava Kalwa | धोम डावा कालवा फुटला, मध्यरात्री ओढ्याला पुर आल्याने ऊसतोड मजुरांचे संसार वाहून गेले

0

सातारा : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Satara Dhom Dava Kalwa | वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावाजवळ लेंडी पुल येथे मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास फुटला. यानंतर एकच हाहाकार उडाला. कालव्याचे पाणी शेतातून वेगाने ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरल्याने पुराचे स्वरूप आले. ओढ्याच्या किनारी राहात असलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. त्यांचे संसार वाहून गेले. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. (Satara Dhom Dava Kalwa)

मध्यरात्री कालवा फुटल्यानंतर अचानक ओढ्याला पूर आल्याने सुमारे १५० झोपड्यांत पाणी शिरले, गुरं वाहून जाऊ लागली. या पुरातून १२ बैलांना वाचवण्यात आले आहे, तर २ बैल अजूनही बेपत्ता आहेत. वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे पहाटे चार वाजता घटनास्थळी आले. प्रशासनाने तातडीने ऊसतोड मजुरांना सुरक्षित ठिकाणी हलवून मदत देण्याचे काम सुरू केले आहे. (Satara Dhom Dava Kalwa)

पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात शिरले.
यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. झोपेत असलेल्या ऊसतोड मुजरांच्या दीडशे झोपड्यांमध्ये पाणी शिरले.
यामुळे झोपड्या, संसारोपयोगी साहित्य, पैसे वाहून गेले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.