Pune Pimpri Chinchwad Crime News | विवाहित महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी, नकार दिल्याने केला खून; रावेत येथील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हाऊसकीपिंगचे काम करणाऱ्या महिलेकडे प्रेमसंबंध (Love Affair) ठेवण्याची मागणी केली. परंतु तिने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आणि पोलिसांना (PCPC Police) याबाबत सांगणार असल्याचे सांगितले. यावरुन आरोपीने महिलेला बेदम मारहाण करुन तिचा खून (Murder) केला. हा प्रकार रावेत येथे बुधवारी (दि.13) सकाळी साडे अकरा ते सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान फेलिसिटी सोसायटीच्या (Felicity Society) क्लब हाऊस मधील पहिल्या मजल्यावरील स्टोअर रुममध्ये घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

प्रतिमा प्रमोद यादव (वय 32, रा. फेलिसिटी प्रोजेक्ट, लेबर कॅम्प रावेत. मूळ रा. बिलासपुर, छत्तीसगढ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद रामेश्वर यादव (वय 34) यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Rawet Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरिफ झुल्फिकर मल्लीक (वय 21, रा. मोशी) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद यादव हे त्यांच्या कुटुंबासह रावेत येथील फेलिसिटी सोसायटीत राहतात. त्यांना तीन मुलं आहेत. प्रमोद यादव हे मिस्त्री काम करतात तर मयत प्रतिभा सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे (Housekeeping) काम करत होत्या. तर आरोपी याच सोसाटीमध्ये प्लंबिंगचे काम करतो.

प्रतिभा बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता कामावर गेल्या. सोसायटीच्या क्लब मध्ये काम करत असताना आरिफ
याने त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला. तसेच आपण दोघे जण प्रेमसंबंधात राहून असे आरिफ म्हणाला.
मात्र, प्रतिभा यांनी त्याच्यासोबत प्रेमसंबंधात राहण्यास विरोध केला. तसेच हा प्रकार आपल्या पतीला व पोलिसांना
सांगणार असल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरिफ याने प्रतिभा यांचा गळा आवळला. तसेच हाताने मारहाण केली.
यानंतर प्रतिभा यांना भिंतीवर ढकलून दिल्याने यात त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रावेत पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सुरु केला.
तपासादरम्यान आरोपी आरिफ याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल टार्फे (PSI Anil Tarfe) करीत करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.