पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Fire News | कसबा पेठेतील जुन्या लाकडी वाड्याला पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. वाडा बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. (Pune Fire News)
कसबा पेठेतील शनिवारवाडा परिसरात पेशवेकालीन मोटे मंगल कार्यालयाजवळ जुना महाजन वाडा (Mahajan Wada) आहे. गेली २० ते २५ वर्षे वाडा पडीक आहे. या तीन मजली वाड्याला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. संपूर्ण वाड्याने पेट घेतल्यानंतर त्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. लाकडी वाडा असल्याने आगीने लवकर पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या व टँकर घटनास्थळी पोहचले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. (Pune Fire News)
परंतु, आग अगोदर पूर्ण भडकली होती. संपूर्ण वाड्याने पेट घेतला असल्याने या आगीत संपूर्ण वाडा जळून खाक झाला आहे. वाड्याचा संपूर्ण कोळसा झाला आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त
- मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 52 वर्षीय चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त
- जबरी चोरी व मोबाईल चोरी करणारा अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात, 10 गुन्हे उघडकीस
- सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन महिलांचा विनयभंग, वडकी परिसरातील घटना
- अश्लील मेसेज करुन महिलेचा विनयभंग, सहकारनगर मधील घटना
- न्यूड फोटो व व्हिडिओ पाठवून दोन महिलांचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल; कर्वेनगर मधील प्रकार