Budget 2024 | पगारदार वर्गासाठी अर्थसंकल्पात होणार मोठी घोषणा! सरकारच्या ‘या’ घोषणेने होईल मोठा फायदा

नवी दिल्ली : Budget 2024 | आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी लवकरच अर्थसंकल्प सादर होणार आहे. पुन्हा एकदा पगारदार वर्ग इन्कम टॅक्समध्ये दिलासा मिळण्यासाठी एखाद्या मोठ्या घोषणेची अपेक्षा करत आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार यावेळी अर्थमंत्रालय करदात्यांसाठी नवीन कर प्रणाली अंतर्गत मिळणारे स्टँडर्ड डिडक्शन लिमिट वाढवण्याचा विचार करत आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकार जुन्या कर प्रणालीत (Old Tax Regime) सध्या तरी कोणताही बदल करणार नाही.
सध्या अर्थसंकल्पासाठी अर्थ मंत्रालयात विविध मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. काही बाबतीत अर्थमंत्रालय इतर विभागांशी चर्चा करणार आहे. या सर्व गोष्टींवर निर्णय पीएमओकडून मिळत असलेल्या सूचना विचारात घेऊन घेतला जाईल.
टीओआयच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकारचे बहुतांश विभाग टॅक्सपेयर्स, विशेषता मिडल क्लासला दिलासा देण्याच्या बाजूने आहेत. मिडल क्लास आता आपल्या टॅक्सच्या बदल्यात मिळत असलेल्या आरोग्य आणि शिक्षणासारख्या सुविधांवर प्रश्न उपस्थित करत आहे. हे मोदी सरकारसाठी अडचणीचे ठरू शकते. यामुळे मध्यम वर्गाला कर सवलत देऊन खुश केले जाऊ शकते.