Pune Crime News | न्यूड फोटो व व्हिडिओ पाठवून दोन महिलांचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल; कर्वेनगर मधील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | न्यूड फोटो आणि व्हिडिओ (Nude Photos & Videos) पाठवून एका महिलेचा विनयभंग (Molestation Case) केला. तर महिलेच्या मैत्रिणीला अश्लील मेसेज (Obscene Messages) करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर वारजे पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत पीडित महिलेच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत कर्वेनगर येथे राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) शुक्रवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश सुनिल शहाणे Akash Sunil Shahane (रा. साततोटी पोलीस चौकी जवळ, कसबा पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354/A/1, 504 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश शहाणे हा फिर्य़ादी यांच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. त्याने फिर्य़ादी यांच्या मोबाईलवर महिला व पुरुषांचे न्यूड फोटो व व्हिडिओ पाठवले. याचा जाब विचारला असता आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या आणखी एका मैत्रिणीला आरोपीने अश्लील मेसेज केले. तसेच वारंवार फोन करुन त्रास देऊन विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (Sr PI Sunil Jaitapurkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.