Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) नोकरी लावण्याच्या आमिषाने वेळोवेळी २१ लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत वडगाव बुद्रुक येथील एका नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल सतीश कुलकर्णी Rahul Satish Kulkarni (रा. उल्हास सोसायटी, सहकारनगर नं. २) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ जुलै २०१४ ते १ डिसेबर २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाला महापालिकेत नोकरी लावून देतो, असे आरोपीने
आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये चेक स्वरुपात व १३ लाख ५० हजार रुपये रोख स्वरुपात
वेळोवेळी घेतले. भावाला नोकरी लावण्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.
तसेच घेतलेले पैसे परत केले नाहीत. आरोपी राहुल कुलकर्णी याने सिक्युरिटी म्हणून दिलेले त्याच्या बँकेचे चेक देखील
बँकेत भरुन न देता फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर (API Balkrishna Nanekar)
तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.