Pune Crime News | पुण्यात औंध परिसरात गोळीबार, प्रचंड खळबळ

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. घोरपडी पेठ, सिंहगड रोड याठीकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यातच मंगळवारी (दि.7) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीत एका कोरियन नागरिकावर गोळीबार (Firing In Pune) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना सकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास औंध परिसरातील ऍलोमा काऊंती या आलिशान सोसायटीच्या परिसरात घडली आहे. (Pune Crime News)

औंध परिसरातील ऍलोमा काऊंती या सोसायटीच्या परिसरामध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुखावर एका अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी त्या व्यक्तीला लागली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील (Chaturshringi Police Station) पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. (Pune Crime News)

घटनास्थळावर पोलिसांना एक रिकामी पुंगळी सापडली आहे. त्यानंतर तात्काळ न्यायवैधक प्रयोगशाळेच्या
बॅलेस्टिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन
ही गोळी नेमकी कोणत्या बंदुकीमधून झाडण्यात आली याचा अंदाज घेतला. गोळीबार झालेली व्यक्ती ही दास या
बड्या कंपनीची रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाची प्रमुख आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (IPS Balaji Pandhare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.