Mukesh Ambani | मुकेश अंबानींना पुन्हा धमकी! ७ दिवसांत चौथ्यांदा शादाब खानच्या नावाने आला मेल

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने दोन ईमेल पाठवून धमकी (Threat to kill) दिली आहे. शादाब खान असा त्याने आपल्या नावाचा उल्लेख केला आहे. मागील ७ दिवसात तब्बल ४ वेळा अंबानी (Mukesh Ambani) यांना धमकीचे ईमेल आले आहेत. या मेलचा शोध लावण्यात तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. धमकीच्या नव्या ईमेलमध्ये अज्ञाताने म्हटले आहे की, ईमेल आणि पैशाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील.

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना हा ईमेल ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे हे दोन ईमेल बेल्जियममधील एकाच सर्व्हरवरून आणि एकाच ईमेल आयडीवरून आले आहेत. याआधीही मुकेश अंबानी यांना एकाच ईमेल आयडीवरून शादाब खान नावाच्या व्यक्तीकडून तीन धमकीचे मेल आले होते.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक ईमेलमध्ये खंडणीची (Extortion) रक्कम अनेकपटीने वाढवल्याचे दिसत आहे. २७ ऑक्टोबर रोजी धमकी देणाऱ्या व्यक्तीने २० कोटी रुपये मागितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने २०० कोटी रुपयांची खंडणी मागितली. यानंतर, तिसऱ्या मेलमध्ये धमकी देणाऱ्याने खंडणीची रक्कम ४०० कोटी रुपये केली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, पोलिस मला शोधू शकणार नाहीत, तसेच मला अटक करू शकत नाही. ज्या ईमेल आयडीवरून पूर्वीचे ईमेल आले होते त्याच ईमेल आयडीवरून हा ईमेल आला आहे.

विशेष म्हणजे, मुंबई पोलिस यांना (Mumbai Police) अजूनही इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच
जुन्या ईमेलचा आयपी अ‍ॅड्रेस शोधता आलेला नाही. पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून या ईमेलच्या
तपशीलांची पडताळणी करण्यासाठी बेल्जियन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क कंपनीची मदत मागितली आहे.
हे मेल [email protected] वरून पाठवण्यात आले आहेत.

तांत्रिक तज्ज्ञांच्या मते हा आयपी अ‍ॅड्रेस बेल्जियमचा आहे. पण पोलिसांना संशय आहे की धमकी देणारी व्यक्ती इतर
कोणत्यातरी देशात स्थित आहे, आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बेल्जियमचे आभासी खासगी नेटवर्क वापरत आहे.

यापूर्वी देखील अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे.
गेल्या वर्षी ५ ऑक्टोबरला एका व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात फोन करून
अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली होती.
त्याचे नाव राकेश कुमार शर्मा असे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.