Maharashtra Rains | महाराष्ट्रात आणखी 3 दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : एन पी न्यूज 24 – Maharashtra Rains | राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊसाचा (Maharashtra Rains) जोर वाढत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भामध्ये (Vidarbha) अनेक भागात गारपीठ दिसून आली आहे. ऐन कडाक्याच्या हिवाळ्यात पावसाच्या आगमनाने शेतकरी चिंतेत पडला आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांचे यामुळे नुकसान होत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने थंडीची लाट उसळली आहे. राज्यात आणखी 3 दिवस पाऊस कायम राहणार आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) देण्यात आली आहे.
आगामी 3 दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. विदर्भातील 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. आज (बुधवार) नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. आगामी 2 ते 3 तासाच याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितलं आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान राज्यात (Maharashtra Rains) आगामी 3 दिवस हीच स्थिती कायम असणार आहे.
१२ जानेवारी:
विदर्भात १२- १४ जानेवारी काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसांची शक्यता, गडगडाटासह.
मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसांची शक्यता ह्या २ दिवसात.
– IMD pic.twitter.com/sHEpotAVfh— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 12, 2022
दरम्यान, आज (बुधवारी) पहाटे महाबळेश्वरच्या वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ नोंदवला आहे. पाचगणीतही किमान तापमानात मोठी घट झाली आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठत असतात. परंतु, यंदा डिसेंबरमध्ये अपेक्षित थंडी पडली नाही. पण जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीची लाट आली आहे. आज सकाळी महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ पोहोचला आहे.
पुण्यातील तापमानाच्या नोंदी – (अंश सेल्सिअस)
राजगुरूनगर –10.2
माळीण – 10.4
पाषाण – 10.5
हवेली – 10.7
एनडीए – 11.1
निमगीरी – 11.1
शिवाजीनगर – 11.2
तळेगाव – 11.3
Web Title :- Maharashtra Rains | rainfall continues in maharashtra for next 3 days imd give yellow alert to 7 districts in Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Gondia, Chandrapur and Gadchiroli
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ, हल्लेखोरांची नावे निष्पन्न
PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेचे पैसे ‘या’ शेतकऱ्यांना परत करावे लागणार; जाणून घ्या