Miss Maharashtra Police Pratibha Sangle | पोलीस कॉन्स्टेबल झाली ‘मिस महाराष्ट्र’, शेतकऱ्याच्या पोरीनं केली ‘कमाल’

0

बीड : एन पी न्यूज 24 – Miss Maharashtra Police Pratibha Sangle | बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतिभा सांगळे (Pratibha Sangale) यांनी ‘मिस महाराष्ट्र’चा (Miss Maharashtra) किताब पटकावला आहे. बीडमध्ये (Beed) महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. कुस्तीपटू (Wrestler), पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. (Miss Maharashtra Police Pratibha Sangle)

 

प्रतिभा सांगळे यांनी पोलीस दलात कर्तव्य पार पाडत असताना मिस महाराष्ट्र हा किताब पटकावला आहे. सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील (Ashti Taluka) असून त्या 2010 पासून बीड पोलीस दलात (Beed Police Force) कार्यरत आहेत. सध्या त्या बीड पोलीस मुख्यालयात (Beed Police Headquarters) महिला कॉन्स्टेबल (Constable) म्हणून कर्तव्य बजावत आहेत. पोलीस दल, कुस्ती आणि मॉडलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.

प्रतिभा यांना मागील अनेक वर्षापासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेत (Beauty Contest) सहभागी होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. अखेर त्यांनी डिसेंबरच्या अखेरीस पुण्यात (Pune) पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अपचा (First Runner Up) किताब पटकावत मिस महाराष्ट्र स्पर्धेपर्यंत आणि तेथून थेट विजेतेपदापर्यंत झेप घेतली.
केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही गाजवले आहे.
यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे (Miss India Universe) स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपली पुढची तयारी सुरु ठेवली आहे.

 

मिस महाराष्ट्र हा किताब पटकावल्यानंतर प्रतिभा सांगळे म्हणाल्या, माझे आजोबा कुस्तीपटू होते. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी कुस्तीच्या रिंगणात उतरले. मी पोलीस दलात खेळाडू म्हणून जॉइन झाले.
त्यानंतर लहानपणी शाळा, गॅदरींगमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे तेंव्हाचे जे छंद होते ते
आता जोपासले पाहिजेत असे वाटले. यातून सौंदर्य स्पर्धेकडे मी वळाले.
बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. येथे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी आहे.
मी पालकांना आवाहन करते की मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न करु नका. तसेच मुलीचा बालविवाह देखील करु नका यासाठी आपण जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title : – Miss Maharashtra Police Pratibha Sangle | maharashtra beed police pratibha sangle wins miss maharashtra contest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आणखी 3 दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

PM Jan-Dhan Account मध्ये जमा रक्कमेबाबत मोठे अपडेट, जाणून घ्या काय सांगतात Finance ministry चे हे आकडे

Pune Crime | पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ, हल्लेखोरांची नावे निष्पन्न

Leave A Reply

Your email address will not be published.