जगातील सर्वात प्रबळ महिलांच्या यादीत निर्मला सितारामन, महाराणी एलिझाबेथलाही मागे टाकले

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – जगातील सर्वात प्रबळ शंभर महिलांची २०१९ ची यादी फोर्ब्सने प्रसिद्ध केली असून यामध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या नावाचाही समावेश आहे. सितारामण यांचे नाव ३४ व्या स्थानावर आहे. त्यांनी महाराणी एलिझाबेथला यांनाही मागे टाकले आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या सर्वाधिक प्रबळ महिलांच्या यादीत पुन्हा वरच्या स्थानी आहेत.

भारतातून पुन्हा एकदा बायोकॉन या औषध कंपनीच्या एमडी आणि सीईओ किरण मुजूमदारसुद्धा फोर्ब्सच्या यादीत झळकल्या आहेत. तसेच निर्मला सीतारामन यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. जगभरातील २३ महिलांची नावे नव्यानेच या यादीत समाविष्ठ करण्यात आली आहेत.

यामध्ये आयएमएफच्या क्रिस्टालिना जॉर्जीवा, पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग, वॉलमार्ट इंटरनॅशनलच्या अध्यक्ष आणि सीईओ आणि भारत सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि पॉप गायक, गीतकार रिहाना यांचा समावेश आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.