चोरीच्या संशयावरुन वाघोलीजवळ १० जणांना पकडले

0

पुणे : एन पी न्यूज 24 – वाढत्या चोऱ्या, जबरी चोऱ्या यामुळे त्रस्त झालेल्या आव्हाळवाडी ग्रामस्थांनी पोलिसांबरोबर रात्रगस्त सुरु केली आहे. त्यात आव्हाळवाडी रोडवर रात्री १० जण संशयास्पदरित्या अंधारात थांबल्याचे आढळून आल्याने ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. हे सर्व जण उत्तर प्रदेशातील आहेत.

पोलिसांनी त्यांना लोणीकंद पोलीस ठाण्यात आणले. टेम्पो व मोटारसायकलवरुन ते सर्व जण येथे आले होते. त्यांच्याकडे गिरमिट, एक्सा ब्लेड असे साहित्य सापडले. अर्जुन मथुरा यादव (वय ३२), समशेर अली निजामजुद्दीन रहमानी (वय २५), अनिलकुमार राममिलन यादव (वय २०), मन्नूलाल विजय बहादूर पासवान (वय २६), अरुण ननके यादव (वय २४), शांताराम द्वारका यादव (वय ३३), अख्तर बरसाती रहमानी (वय २१), मोहम्मद मंजूर अली अस्लम खान (वय ३१), बुक्केल पतई पासवान (वय ३१), दिनेश गंगाराम शर्मा (वय ३५) अशी त्यांची नावे आहेत.

ते १० जण उत्तरप्रदेश राज्यातील असून सोहरतगड, इटवा, तुलसीपुर, या तालुक्यातील असून सिद्धर्थनगर जिल्ह्यातील आहेत. गेल्या २ महिन्यांपासून ते पुण्यातील सुस गाव, सुतारवाडी, कुदळवाडी, चिखली भागात राहतात. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये ते काम करतात. कामासाठी त्यांच्या एका साथीदारांनी त्यांना आव्हाळवाडी येथे बोलविण्यात आले होते. पोलसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन चांगल्या वर्तणुकीचा एक वर्षाचा बाँड घेऊन त्यांची सुटका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.