खुशखबर ! रेल्वेत मिळणार मनपसंद जेवण, 40 ते 250 रूपये मोजावे लागणार

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबरी आहे. यापुढे रेल्वेत मिळणाऱ्या जेवणात मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. लवकरच रेल्वे नवीन केटरिंग पॉलिसी आणणार असून यामध्ये रेल्वेत क्लासच्या हिशोबाने वेगवेगळे जेवण मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये कॉम्बो मिल्सचा देखील समावेश असणार आहे. त्याचबरोबर जेवणाची किंमत देखील ठरवली जाणार आहे. यामध्ये 40 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत किंमत असण्याची शक्यता आहे.

40 ते 50 रुपयात मिळणार जेवण
रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, रेल्वे या संबंधी एक पॉलिसी तयार करत असून यामध्ये 40 ते 50 रुपयांमध्ये जेवण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

  200-250 रुपयांपर्यंत थाळी
जर प्रवाशांना संपूर्ण थाळी हवी असेल तर त्यांना त्याची देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी त्यांना 220 ते 250 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे कमी पैश्यात जास्त खाद्यपदार्थ देऊ शकत नसल्याने आम्ही प्रत्येकाचा विचार करून हि पॉलिसी तयार करत आहोत.

Attachments area
Leave A Reply

Your email address will not be published.