युतीमध्ये शिवसेना होणार लहान भाऊ ? ‘या’ फॉर्म्युल्यावर लवकरच शिक्कामोर्तब ?

0

मुंबई :एन पी न्यूज 24  – पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपली जागावाटपाची चर्चा सुरु केल्यानंतर सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपने देखीलजागावाटपाची अंतिम चर्चा सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत निम्म्या- निम्म्या जागा लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पुन्हा भाजप शिवसेनेला धोबीपछाड देण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील शिवसेनेला लहान भावाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.

या विधानसभा निवडणुकीत  भाजप 154 ते 159 जागा  लढविणार तर शिवसेना 120 जागा लढविणार असल्ल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा देणार असल्ल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेना हा फॉर्म्युला स्वीकारणार कि नाही हे पाहणे फार महत्वाचे आहे.

आज मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचबरोबर कोणत्या मतदारसंघात आपली ताकद आहे, याचादेखील या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली यंत्रणा कामाला लावली असून पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

Leave A Reply

Your email address will not be published.