धक्कादायक ! X गर्लफ्रेन्डनं ‘सिक्रेट’ मुलाची दाखवली भीती, उकळले 26 लाख, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली :एन पी न्यूज 24 – इंग्लंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडला धमकावून त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. तसेच त्याने जर तिला पैसे दिले नाही तर तुझ्या सिक्रेट मुलाचा त्याच्या गर्लफ्रेंडजवळ खुलासा करण्याची देखील धमकी दिली.
चेलसिया रॉबर्ट्स असे या 26 वर्षीय महिलेचे नाव असून तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला धमकी देत त्याच्याकडून सिक्रेट मुलगा आणि बलात्काराची धमकी देत 26 लाख रुपये उकळले. तिने दावा केला होता कि, तिने जॅक्स या मुलाला जन्म दिला होता. मात्र प्रत्यक्षात असा कोणताही मुलगा अस्तित्वात नव्हता. तिने खोटे सांगून आणि ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे वसूल केले होते. तिने कोर्टात हे सर्व खोटे असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, तिच्यावर खटला दाखल झाला असता तिला या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आले असून तिला चार महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.