बुद्धी तल्लख, तर अ‍ॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’

0

एन पी न्यूज 24 – पाइन नट्स हे बदामापेक्षाही जास्त लाभदायक असतात. याच्या बीया खाल्ल्या जातात. काही दिवस याचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात. हे खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते, तर अ‍ॅलर्जीचा त्रास दूर होतो. शिवाय, आणखीही अनेक आरोग्य फायदे होतात.  मुलांनी २ ते ३ पाइन नट्स आवश्य खावेत. याबाबत अनेक लोकांना माहित नसल्याने हा सुकामेवा दुर्लक्षित राहिला आहे. या सर्व पोषण तत्व आहेत. पाइन नटमध्ये व्हिटॅमिन ए, इ, बी१, बी२, सी, कॉपर, मॅग्नेशिअम, जिंक, मॅग्नीज, कॅल्शिअम आणि आयर्न असते. हे नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात, याविषयी माहिती घेवूयात.

हे आहेत फायदे

अ‍ॅलर्जी 
हे मधासोबत सेवन करावे. अ‍ॅलर्जी दूर करते. खोकला, सर्दी किंवा खाज येत असेल तर हा त्रास दूर होतो.



स्नायू आखडणे 

स्नायू आखडणे किंवा पायांच्या नसा एकांवर एक चढणे अशी समस्या असल्यास हे एक रामबाण औषध आहे. यामधील ओलिक आणि लिनोलेनिक अ‍ॅसिड या समस्या दूर करतात.


लठ्ठपणा

वजनही कमी होते. रोज रिकाम्या पोटी ५ पाइन नट्स खाऊन एक तुकडा कोरफड आणि लिंबू पाणी प्यावे. वजन कमी होते.

मधुमेह
मधुमेहात पाइन नट्स खाणे लाभदायी आहे.


उंची वाढते

रोज २-३ पाइन नट्स मुलांना दिल्यास त्यांची उंची वाढू शकते. यातील कॅल्शिअम हाडांची उंची वाढवण्यास मदत करतात.

तल्लख बुद्धी 
यातील बी१ मुळे बुद्धी तल्लख होते. मेंदूसाठी हे एका टॉनिकप्रमाणे काम करते..


गर्भवती महिला

गर्भवती महिला आणि अ‍ॅनिमीयाच्या रुग्णांनी पाइन नट्स खावेत. यातील लोह सरळ शरीरात अब्जॉर्ब होते.



तणाव, डिप्रेशन

५ पाइन नट्स खाऊन लिंबू पाणी प्यावे, यामुळे तणाव आणि डिप्रेशन दूर होते. यातील अँटीऑक्सीडंट्स डिप्रेशन, डोकेदुखी, तणाव अशा समस्या दूर करते.


हे ठेवा लक्षात

* हे हाताने सोलून खावे. चाकूचा वापर करू नये.
* रिकाम्या पोटी या नट्सचे सेवन करू नये. हे भाजीमध्ये टाकूनही खाता येते.
* ५हून अधिक पाइन नट्स कधीही खाऊ नये.
* हे साल असलेलेच खरेदी करावेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.