‘DL’ आणि ‘RC’ नसलं तरीही टाळता येईल पोलिसांची कारवाई, दंड ! फक्त करावा लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –  देशात वाहतूक नियम उल्लंघनाचे नवे नियम लागू झाल्यानंतर दंड दुपटीने वाढला आहे. अनेक प्रकरणं अशी आहे की वाहतूक नियमाचे उल्लघंन केल्यानंतर वाहनाच्या किंमतीपेक्षा जास्त दंड वाहन चालकांना भरावा लागला. तज्ज्ञ सांगत आहे की मोटार वाहन कायद्यानुसार वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास (RC) किंवा इतर कोणतेही कागदपत्र लगेचच दाखवू न शकल्यास वाहतूक पोलीस दंड ठोठावू शकत नाही. यासाठी वाहन चालकांना काही दिवसांचा अवधी देण्यात येतो. जर त्यानंतरही दंड ठोठावला तर वाहन चालक न्यायालयात जाणून कागदपत्र दाखवून दंड माफ करुन घेऊ शकतो.

सध्या वाहतूकीचे नवे नियम लागू झाल्यापासून कोणतेही कागदपत्र नसल्यास चलन कापले जात आहे. परंतू तज्ज्ञ सांगत आहे की, वाहन चालकांना कागदपत्र दाखवण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात येतो. वाहतूक पोलीस त्याचे चलन लगेचच कापू शकत नाही. जर चालक 15 दिवसात कागदपत्र दाखवल्याचा दावा करतो तर त्याला दंड ठोठावता कामा नये. यानंतर 15 दिवसात चालकाला संबंधित कागदपत्र अधिकाऱ्यांना दाखवावे लागतील. न्यायालयात जाऊन चलन रद्द करण्याचा पर्याय देखील यात देण्यात आला आहे.

तुम्हाला दंड भरण्याची आवश्यकता नाही –
जर वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला तर तुम्ही दंड रद्द करु शकतात. यासाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागेल. न्यायालयात तुम्ही सर्व वैध कागदपत्र दाखवू शकतात. न्यायालयात स्पष्ट झाले की तुम्ही संपूर्ण कागदपत्र जमा करण्यासाठी तुम्हाला वेळ देण्यात आला नाही तर तुमचा आर्थिक दंड माफ करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.