पोलिसांचा दंड भरल्यानंतर विराट कोहलीची वाईट अवस्था : चाहत्यांनी केले मोठ्या प्रमाणात ट्रोल

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या भारतीय संघाबरोबर विंडीज दौऱ्यावरून परतला असून या दौऱ्यावर भारतीय संघाने तीनही मालिकेत शानदार विजय मिळवत विंडीजला क्लीन स्वीप दिला आहे. मात्र त्यानंतर त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोनंतर त्याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे.

या फोटोंमध्ये तो शॉर्ट्स घालून बसलेला दिसू येत आहे. त्याचबरोबर तो शर्टलेस असल्याने त्याच्यावर विविध कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर ट्विट करताना म्हटले कि, पोलिसांचा दंड लागल्यानंतर विराट कोहलीची झालेली हि अवस्था आहे. सध्या भारतात वाहतूक नियम अतिशय कडक करण्यात आले असून 1 सप्टेंबरपासून दंडाच्या रकमेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यावरून देखील सध्या मोठ्या प्रमाणात मिम्स देखील व्हायरल होत आहेत.

त्यानंतर आता यावरून विराट कोहली याला देखील ट्रोल करण्यात आले आहे. हा फोटो टाकत विराट कोहली याने म्हटले कि, जोपर्यंत आपण स्वतःमध्ये डोकावून पाहत आहे तोपर्यंत आपल्याला बाहेर कुठेही पाहण्याची गरज पडत नाही. मात्र याच फोटोवरून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. काहीजणांनी त्यावर म्हटले कि, विराट तुला कुणी मारले आहे का ? तर कुणी लिहिले कि, तू हे कपडे घालून देखील बोलू शकला असतास. तर काही जणांनी म्हटले कि, अनुष्का वाहिनीने घराबाहेर काढल्यासारखी तुझी अवस्था झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.