हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत हे ५ आजार, जाणून घ्या

0

एन पी न्यूज 24 – हाताच्या तळव्यांचा रंग स्वच्छ आणि समान असणे आवश्यक आहे. हा रंग एकसमान नसेल, काही भागांमध्ये तो वेगवेगळा असेल तर आरोग्याच्या काही समस्या असू शकतात. लांब, मजबूत, रूंद हाताचा तळवा हे चांगल्या आरोग्याचे लक्षण समजले जाते. हातांच्या तळव्यांवरून, त्यांच्या रंगावरून आरोग्याविषयी माहिती कशी समजून घ्यावी, याविषयी जाणून घेवूयात.

कठोर तळवा
तळव्यांच्या मधील भाग कडक असल्यास किंवा हलक्याशा वेदना झाल्यास शारीरीक तसेच मानसिक थकवा असू शकतो. यामुळे ह्रदय कमकुवत होण्याची व चयापयच क्रिया बिघडण्याचा धोका असतो.

कोरडा तळवा
तळवा सतत कोरडा असणे हे शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण आहे. कमी पाणी पिणे, आहारात जास्त मीठ घेतल्यास हात कोरडे दिसतात.

पिवळा आणि लाल रंग 
हातांच्या तळव्यांच्या काही भागाचा रंग लाल असेल तर तो ह्रदय आणि रक्ताभिसरणाच्या आजाराविषयी संकेत असू शकतो. पिवळा रंग असल्यास हा लिव्हर आणि गालब्लॅडरविषयीच्या आजाराचा संकेत असू शकतो.

ओलसर तळवा
तळवा नेहमी घामाने ओलसर राहत असल्यास शरीरात गरजेपेक्षा अधिक पाणी असू शकते. यामुळे ह्रदय, सर्कुलेशन सिस्टीमला अधिक काम करावे लागते. त्यावर ताण पडतो.

Attachments area
Leave A Reply

Your email address will not be published.