रक्तदान करण्‍यापूर्वी लक्षात ठेवा या ७ गोष्‍टी, अन्‍यथा होईल वाईट परिणाम

रक्तदान
5th September 2019

एन पी न्यूज 24 – निरोगी माणसाने रक्तदान नेहमी केले पाहिजे. यामुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचू शकतात. यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान म्हटले आहे. आज अनेकांना रक्तदानाचे महत्व पटल्याने रक्तदान सर्वत्र मोठ्याप्रमाणात केले जाते. रक्तदात्यांनी सुद्धा रक्तदान करताना काही गोष्टींची काळजी घेणे खुप गरजेचे असते.  परंतु या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास रक्तदाता आणि गरजूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

अशी घ्या काळजी 

 रक्तदानापूर्वी २४ ते ४८ तास आधी सिगारेट ओढू नका. अल्कोहोल घेऊ नका.

 रक्तदान करण्यापूर्वी १ तास आधी काहीच खाऊ नका.

 ब्लड डोनेट करण्यापूर्वी सोडा असलेले पेय घेऊ नका.

 योग्य वजन, हिमोग्लोबिनची तपासणी करा.

 हिपॅटायटिस-बी, हिपॅटायटिस-सी, एचआयव्ही आणि मलेरियाची तपासणी करा.

 रक्तदान करण्यापूर्वी रक्तदाब तपासणी करा.

 ब्लड ग्रुप ए, बी, ओ आणि आरएच फॅक्टर तपासून घ्या.