अशा प्रकारे लावा ‘काजळ’, दिवसभर राहिल ‘जसेच्या तसे’

0

एन पी न्यूज 24 – काही महिला काजळ, आयलायनर नेहमीच लावतात. मात्र, ते अनेकदा दिवसभर टिकत नाही. लगेचच पसरते. यामुळे चेहरा खराब दिसू शकतो. काजळ पसरू नये म्हणून चांगल्या दर्जाचे काजळ वापरावे. काजळ योग्य पद्धतीने लावले तर ते पसरणार नाही. काजळ लावताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती घेवूयात.

अशी घ्या काळजी

१ डोळ्यांवर जाडसर आयलायनर लावण्यासाठी स्मज-फ्री काजळ पेन्सिल वापरा. चांगल्या क्वालिटीचे काजळ वापरा. हलक्या दर्जाचे काजळ वापरले तर डोळ्यांना इजा होण्याची होऊ शकते.

२ डोळ्यांच्या आतील किंवा बाहेरील टोकांना काजळ लावणे टाळा. टोकांवर काजळ पसरू शकते.

३ अतिरिक्त तेलामुळे डोळे निस्तेज दिसू शकतात. पापण्यांजवळ तेल असेल तर कापसाच्या बोळाने ते नियमित टीपा.

४ काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खालचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा. तेथील ऑईल ग्लँड्समधून अतिरिक्त तेल बाहेर पडणार नाही ही काळजी घ्या. यासाठी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. यानंतरच काजळ लावा.

५ काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर आणि डोळ्यांच्या दोन्ही कडांना पावडर लावा. यामुळे त्याभागातील ओलावा दूर होईल. काजळ पसरणार नाही. काजळ लावल्यानंतर अतिरिक्त पावडर ब्रशने पुसून घ्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.