Dark Circle Instant Removal Trick | आता 1 मिनटात डार्क सर्कल्स करा गायब, जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dark Circle Instant Removal Trick | आपल्या सर्वांनाच A वन टोन असलेला सुंदर चेहरा असावा असा कायम वाटते असते पण डोळ्या खालील काळी वर्तुळे आपल्या चेहऱ्याचे आकर्षण कमी करतात. चेहऱ्याचे तेज कमी दिसू लागते आणि सर्व लक्ष डार्क सर्कल्सवर जाऊ लागते. पण, तुम्ही एका हॅकच्या मदतीने काळी वर्तुळे झटपट लपवू शकता. या ट्रिकच्या मदतीने तुमचा चेहरा नेहमी डार्क सर्कल्स मुक्त दिसेल (Dark Circle Instant Removal Trick). चला, जाणून घेऊयात डार्क सर्कल दूर करण्याचा झटपट मार्ग –

या मेकअप ट्रिकच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे 1 मिनटात गायब करू शकता.

प्रथम, डोळ्याभोवती मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा लोशन लावा.

डोळ्यांखाली ऑरेंज कलरचे कन्सीलर लावा. (केशरी रंगाचे कन्सीलर सावळ्या रंगासाठी योग्य आहे)

उलटा त्रिकोणाच्या आकारात डोळ्याखाली कन्सीलर लावा.

आता शेवटी या भागावर लूज पावडर लावा. ज्यामुळे त्वचेला सॉफ्ट, इवण लुक मिळेल.

ही आहे 1 मिनटात डार्क सर्कल्स लपवण्याची मेकअप हॅक, पण आता कायम स्वरुपी डार्क सर्कल्स पासून सुटका मिळवायचे घरगुती उपाय आपण जाणून घेऊयात –

1. डोळ्यांना मसाज देणे (Giving eye massage)
डोळ्यांवर थकव्यामुळे काळी वर्तुळे येतात. हे टाळण्यासाठी, वेळोवेळी, डोळ्यांना हलक्या गरम हाताने किंवा रुमाल गरम पाण्यात भिजवून व्यवस्थित पिळून घ्या आणि त्याने डोळ्यांना मसाज करा. ब्लड सरक्लूलेशन वाढेल आणि डार्क सर्कल्स कमी होऊ लागतील. (Dark Circle Under Eye Solution)

2 . बटाटा आणि काकडी वापरा (Use potatoes and cucumbers)
व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि या थंडगार भाज्यांमधील दाहक-विरोधी स्वभावामुळे डोळ्यांभोवतीची जळजळ कमी होण्यास मदत होते आणि डार्क सर्कल्स टाळण्यासही मदत होते. बटाटे किंवा काकडी कशी वापरायची – काही कच्चे बटाटे किंवा काकडी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि उभे काप करा नंतर हे तुकडे डोळ्यांवर ठेवा. आराम करा आणि 10-12 मिनिटांनंतर त्यांना काढून टाका. तुम्ही बटाटे किंवा काकडीचा रस देखील काढू शकता. एक कापसाचा गोळा घ्या, तो रसात भिजवा आणि डोळ्यांवर ठेवा. काळ्या वर्तुळांच्या सभोवतालचा संपूर्ण भाग झाकलेला असल्याची खात्री करा. 1-3 मिनिटे राहू द्या आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा. (Dark Circle Instant Removal Trick)

3. दुध वापरा (Use Milk)
कापसाचा गोळा थंड दुधात बुडवून डोळ्याच्या काळ्या पडलेल्या भागात लावा. थोडा वेळ ठेवा आणि नंतर थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा.
आठवड्यातून किमान तीन वेळा वापरा.

4. कोरफड आणि गुलाबजल वापरा (Use aloe vera and rose water)
कॉटन बॉल गुलाब पाण्यात आणि कोरफडाच्या मिश्रणात भिजवा आणि पापण्यांवर ठेवा. 10 ते 15 मिनिटे राहू द्या.
सर्वोत्तम परिणाम पाहण्यासाठी एका महिन्यासाठी प्रत्येक रात्री वापरा.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Dark Circle Instant Removal Trick | dark circle instant removal trick know how to remove dark circle at home

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan | तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे अजूनही मिळालेले नसतील तर ही कामे नक्की करून घ्या

Ration Card | रेशन कार्ड नसेल तरी देखील मिळणार मोफत अन्नधान्य; जाणून घ्या

LIC Aadhaar Shila Plan | महिलांसाठी LIC ची मस्त पॉलिसी ! कमी गुंतवणुक करा अन् मिळवा लाखोंचा लाभ; जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.