आंबा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी

आइस्क्रीम
4th September 2019

एन पी न्यूज 24 – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम शरीरासाठी जास्त हानिकारक नसते. आंब्याच्या खास आइस्क्रिमची रेसिपी जाणून घेवूयात.

अशी तयार करा आंब्याची आइस्क्रिम

साहित्य
* २ आंबे,
* ३ कप फ्रेश क्रीम,
* २ चमचे पिस्ता,
* १ चमचा व्हॅनिला एक्सट्रॅक्ट,
* १ चमचा साखर.

आंबा कापून त्याचे प्लप तयार करा. त्यात एक चमचा साखर टाकून मिक्स करा. क्रीमला चांगली घोटून घ्या आणि त्याला आंब्याच्या मिश्रणात मिक्स करा. चांगले मिक्स झाल्यावर एक चमचा व्हॅनिला एक्सट्रॅक्ट मिसळवा. या मिश्रणाला चांगले घट्ट होईपर्यंत हलवा. काही तास फ्रीजमध्ये ठेवा. आइस्क्रीम देताना त्यावर पिस्ताचे तुकडे टाका.