‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित!

0

एन पी न्यूज 24 – बॉलीवूडच्या अभिनेत्री सौंदर्यासाठी कोणते उपाय करतात? त्या घरगुती उपाय करतात का? त्यांच्या चेहऱ्याची चमक जास्त कशी असते? वाढत्या वयाचा प्रभाव का दिसत नाही? या प्रश्नांची उत्तरे स्वत: या अभिनेत्रींनी वेगवेगळ्या मुलाखतींमधून दिली आहेत. त्यांनी उलगडलेले सौंदर्याचे रहस्य येथे जाणून घेवूयात.

अनुष्का शर्मा
चेहऱ्यावर ती लिंबाचा फेसपॅक लावते. निरोगी त्वचेसाठी हे लाभदायक असल्याचे तिला वाटते. तसेच खोबरेल तेलाने ती डोक्याची मालिश करते.

प्रियंका चोप्रा
प्रियंका दह्याला ती साबणाचा पर्याय मानते. म्हणून तिला दह्याने अंघोळ करणे आवडते. दह्यामुळे केसात कोंडा होत नाही, असे तिचे म्हणणे आहे.

करिना कपूर
आठवड्यातून २-३ वेळा बदामाचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ चांगली होते, असे तिला वाटते. म्हणून ती बदामाच्या तेलाने डोक्याची मालिश करते.

ऐश्वर्या रॉय
बेसनात दूध आणि हळद मिसळून ती चेहऱ्यावर लावते. चेहऱ्यावर दही लावल्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. ती काकडीचा फेसपॅक वापरते.

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी रोज बदाम तेलाने डोक्याचे मालिश करते. यामुळे तिचे केस मुलायम आणि चमकदार राहतात. तिला अ‍ॅलोवेरा जेल लावणे पसंत आहे.

माधुरी
केसांना कंडिशनिंग करण्यासाठी केळीची पेस्ट लावते. ऑलिव्ह ऑइल, केस्टर ऑइलने डोक्याचा मसाज करते.

शिल्पा शेट्टी
गुलाबजल आणि हळदीचा फेसपॅक लावते. शिल्पा ऑलिव्ह ऑइलने चेहऱ्याची मसाज करते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.