गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे

0

एन पी न्यूज 24 – मलाच जास्त डास का चावतात, अशी तक्रार काहीजण नेहमी करत असतात. परंतु, डास चावण्या मागे सुद्धा विविध कारणे आहेत. जास्त डास चावतात म्हणजे डास तुमच्याकडे जास्त आकर्षित होतात, असा त्याचा अर्थ आहे. डास आकर्षित का होतात, याची काही कारणे विविध संशोधकांनी शोधली आहेत. ही कारणे जाणून घेवूयात.

ही आहेत कारणे

१ गरोदरपणा
गरोदरपणात महिलांच्या शरीराचे तापमान थोडे जास्त असते. तसेच अशा महिला जास्त कार्बनडायऑक्साइड सोडतात.

२ अल्कोहोल
दारू प्यायल्याने घरातील एथेनॉलचे प्रमाण वाढते. डासांना हा वास आवडतो.

३ घाम
घामात लॅक्टिक अ‍ॅसिड, युरिक अ‍ॅसिड आणि अमोनिया असतो. यातील तत्व डासांना आकर्षित करतात. म्हणून जास्त घाम येणारांना जास्त डास चावतात.

४ ब्लडग्रुप
एका संशोधनानुसार डास आपल्या रक्तामधून प्रोटीन्स घेतात. जास्त प्राटीन्स असलेल्या रक्तगटातील लोकांना डास जास्त चावतात.

५ त्वचेचा रंग
काही संशोधनात असे आढळून आले आहे की, गोरा रंग असणारांपेक्षा सावळा रंग असलेल्यांना डास जास्त चावतात.

६ कार्बन डायऑक्साइड
कार्बन डायऑक्साइडच्या वासाने डास आकर्षित होतात. जे लोक हा जास्त सोडतात त्यांना डास जास्त चावतात.

७ कपडे
लाल, निळा, काळा, जांभळा असे गडद रंग डासांना सहज ओळखता येतात. अशा रंगाचे कपडे परिधान केल्यास डास जास्त चावतात, असे युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाच्या संशोधनात आढळून आले आहे.

८ त्वचेवरील बॅक्टेरिया
त्वचेतील बॅक्टेरिया डासांना आकर्षित करतात. काही स्किन बॅक्टेरियांच्या वासाने डास दूर पळतात. तर काही बॅक्टेरियांमुळे आकर्षित होतात, असे काही संशोधनात आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.