Sahakar Nagar Pune Crime News | भानामती करीत असल्याच्या संशयावरून जिवे मारण्याचा कट; सहकारनगर पोलिसांनी आरोपींना शिताफीने घेतले ताब्यात

0

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | भानामती करीत असल्याच्या संशयावरून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनु पांडु होडे (वय ६७ धंदा नोकरी रा.मोरे बस्ती रांका ज्वेलर्स मागे प‌द्मावती पुणे) यांच्या फिर्यादीवरून सागर सतीष कुंभार (वय ४१ वर्ष, धंदा काही नाही रा.सी/६/१ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे), तौरस बाळु कारले (वय ४३ वर्षे धंदा नोकरी रा.बी/५९/१९ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे), सागर शशीकांत सोनार (वय ३२ वर्षे धंदा नोकरी रा. मोरे वस्ती रांका ज्वेलर्स मागे प‌द्मावती पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सातारा रोडवरील रांका ज्वेलर्स शेजारील फिश मार्केट समोरील फुटपाथवर दि.१५ रोजी सकाळी पाऊणे आठ वाजताच्या सुमारास सोनु होडे यांना अनोळखी इसमाने चाकुने गळयावर वार करुन जखमी केले होते. त्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये (Sahakar Nagar Police Station) भादवी कलम ३२४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

दाखल गुन्हयामध्ये पोलिसांना अनोळखी आरोपीची कसलीही माहिती मिळत नव्हती. मात्र नंतर गुप्त माहितीद्वारे पोलिसांना अशी माहिती मिळाली की सोनू होडे यांना सागर कुंभार याने चाकुने मारुन जखमी केले होते. दरम्यान पोलीस पथकाने सागर कुंभार याला त्याच्या राहत्या घरातुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यांनतर हा गुन्हा तौरस कारले याच्या सांगण्यावरून केला असल्याचे सांगितले. त्यासाठी तौरस कारले याने ५०,०००/-रु.ची सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली.

हा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने तौरस कारले याला अप्पर डेपो येथुन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा सागर सोनार याच्या सांगण्यावरून केला असल्याची माहिती दिली. त्यासाठी सागर सोनार यांच्याकडून दोन लाख रुपयांची सुपारी घेतल्याचेही त्याने सांगितले. तौरस कारले याच्या सांगण्यावरुन सागर सोनार याला ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने त्याच्या शेजारी राहणारे सोनु होडे हे करणी, भानामती सारखे प्रकार करुन त्रास देत असल्याने व आमचे घर बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याने सदरचे कृत्य केल्याचे तपासात सांगुन फिर्यादी सोनु होडे यांना मारण्यासाठी तौरस कारले यास दोन लाख रुपयाची सुपारी दिल्याची कबुली दिली.

दरम्यान पोलिसांनी सागर सतीष कुंभार (वय ४१ वर्ष, धंदा काही नाही रा.सी/६/१ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे), तौरस बाळु कारले (वय ४३ वर्षे धंदा नोकरी रा.बी/५९/१९ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे) , सागर शशीकांत सोनार (वय ३२ वर्षे धंदा नोकरी रा. मोरे वस्ती रांका ज्वेलर्स मागे प‌द्मावती पुणे) यांच्याविरोधात भादवी. कलम ३०७, १२० (ब), ३४ प्रमाणे कलमवाढ केली आहे. तीनही आरोपींना दाखल गुन्हयात अटक केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे हे करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त नंदीनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस हवालदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, विनोद जाधव, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, अमित पदमाळे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, खंडु शिंदे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.