Baner-Balewadi Pune Crime News | पुणे: लोन ट्रान्स्फर करण्याच्या बहाण्याने मनपुरम फयनान्सची फसवणूक

Cheating Fraud Case

पुणे : Baner-Balewadi Pune Crime News | सोने तारण ठेवून घेतलेले कर्ज टान्सफर करायचे असल्याचे सांगून मनपुरम फायनान्स कडून सात लाखांचे कर्ज घेतले. मात्र, सोने काढून ते मनपुरम फायनान्स कंपनीत जमा न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 19 एप्रिल ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत मनपुरम फायनान्स लि. च्या बाणेर-बालेवाडी फाटा शाखेत घडला आहे. (Cheating Fraud Case)

याबबत नेहा नंदकुमार टेकवडे (वय-31 रा. विंडसर रेसिडेंन्सी सोसायटी, बाणेर-बालेवाडी फाटा, पुणे) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (Chaturshrungi Police Station) दिली आहे. त्यानुसार सहदेव रामप्रकाश शर्मा Sahdev Ramprakash Sharma (रा. श्रीगणेश अपार्टमेंट, सिद्धटेक सोसायटी, पाषाण, सुतारवाडी) याच्यावर आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सहदेव शर्मा याने आय.आय.एफ.एल. फायनान्स कंपनीच्या औंध शाखेत 221.8 ग्रॅम सोने तारण ठेवून 7 लाख रुपये कर्ज घेतल्याचे सांगितले. हे कर्ज मनपुरम फायनान्स मध्ये ट्रान्सफर करायचे असून त्यासाठी आय.आय.एफ.एल. फायनान्सच्या कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी कर्जाची गरज असल्याचे सांगितले. तसेच कर्ज फेडून सोने काढून मनपुरम फायनान्स येथे जमा करतो असे सांगितले.

त्यानुसार मनपुरम फायनान्स कंपनीने आरोपी सहदेव शर्मा याला सात लाख रुपये कर्ज मंजूर करुन कर्जाची रक्कम त्याच्या ICICI बँक खात्यात जमा केली. शर्मा याने आय.आय.एफ.एल. फायनान्स कंपनीच्या कर्जाची रक्कम जमा करुन तिथून सोने काढून घेतले. मात्र, ते सोने मनपुरम फायनान्समध्ये जमा न करता सात लाखांची फसवणूक केली. मनपुरम फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी आय.आय.एफ.एल. फायनान्सच्या औंध शाखेचे मॅनेजर मनोज भोसले व कर्मचारी सोनल ढवळ यांनी आरोपी शर्मा याला मदत केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.