PMC Action On Eskobar Baner Pune | मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुस-बाणेर परिसरातील अनधिकृत बार-हॉटेल्सवर हातोडा (Video)

पुणे : PMC Action On Eskobar Baner Pune | पुण्यातील एफसी रस्त्यावरील (FC Road Pune) लिक्विड, लेजर, लाऊंज या हॉटेलमधील (L3 Bar Pune) बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे (Pune Drugs Party) सेवन करत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कारवाईला वेग आला आहे. Eskobar वर कारवाई करण्यात आली आहे.
शहरात अशा प्रकारच्या अनधिकृत, अतिक्रमण केलेल्या हॉटेल्स आणि बार वर पुणे महापालिकेकडून धडक कारवाई सुरु झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी अनधिकृत हॉटेल्स उध्वस्त करण्याचे आदेश दिल्यामुळे आज पुण्यातील सुस रोड आणि बाणेर भागात मोठी कारवाई करण्यात आली.
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने ही कारवाई केली जात आहे. यामध्ये सुस रस्ता, बाणेर याठिकाणी ज्या हॉटेल्सनी रस्त्याच्या बाजूला अतिरिक्त बांधकाम करून अतिक्रमण केले आहे, त्या हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.