Uttam Nagar Pune Crime News | पुणे: अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल

Pune-Minor-Girl-Rape-Case

पुणे : Uttam Nagar Pune Crime News | इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. संबंध ठेवतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढून मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे मोबाईल, दुचाकीची मागणी करुन आठ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 25 मे ते 3 जून 2024 या कालावधीत कुडजे गावच्या हद्दीत घडला आहे. (Minor Girl Rape Case Pune)

याबाबत शिरुर तालुक्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि.26) उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विकास गजानन जाधव Vikas Gajanan Jadhav (रा. आगळंबे गाव, वर्तकगेट, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 506, 507 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची आणि आरोपी विकास जाधव याची ओळख मे 2024 मध्ये इन्स्टाग्रामवर झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंग सुरु झाले. आरोपीने मुलीला भेटण्यासाठी उत्तमनगर परिसरात बोलावून घेतले. तिला दुचाकीवरून कुडजेगाव परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंध ठेवतानाचा अश्लील व्हिडीओ त्याने मोबाईलमध्ये चित्रीत केला.

त्यानंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार भेटण्यास बोलावून घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने त्याच्याकडे असलेले अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच सोन्याची चैन, मोटर सायकल व मोबाईल फोनची मागणी केली. तसेच तिच्याकडून जबरदस्तीने आठ हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.