Navin Marathi Shala Pune | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत योगदिन उत्साहात साजरा

0

पुणे : Navin Marathi Shala Pune | शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deecan Education Society -DES) नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग (Rajendra Jog) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी ,”आपल्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करावीत असे आवाहन केले.तसेच मनाचे आणि शरीराचे आरोग्य जपण्यासाठी योगाचे महत्व सांगितले”.

इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार योगासने केली तसेच नियमित योगासने व व्यायाम करण्याचा संकल्प केला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासने केली. योगासनाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. स्वप्ना वाबळे यांनी योगदिनाची माहिती सांगितली. मनिषा कदम यांच्यासोबत सर्व विद्यार्थ्यांनी योगगीत म्हटले.

पुष्पा देशमाने यांनी आभार मानले. तनुजा तिकोने,धनंजय तळपे यांनी आयोजन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.