Monsoon Session Maharashtra | पावसाळी अधिवेशन लांबणीवर, 27 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार

0

मुंबई: Monsoon Session Maharashtra | विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधरच्या एकूण चार मतदारसंघांसाठी २६ जूनला होणारी निवडणूक तसेच २५ जून रोजी होऊ घातलेली राज्यसभेची पोटनिवडणूक या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता १० जूनऐवजी २७ जूनपासून घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Results 2024) पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पार पडले होते. या अधिवेशनात सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, तर सन २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जून २०२४ पासून होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

मात्र, आता राज्यसभेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक आणि त्यानंतर २६ जूनला विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुका लक्षात घेऊन विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जूनऐवजी २७ जूनपासून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.