Budget 2024 | सुरू झाली अर्थसंकल्पाची तयारी, मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाकडे लक्ष देण्याची मागणी

नवी दिल्ली : Budget 2024 | औद्योगिक संघटनांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याकडे आगामी अर्थसंकल्पात टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा वाढविण्याची मागणी केली आहे, जेणेकरून छोट्या शहरांमध्ये सहजपणे औद्योगिक युनिटची स्थापना करता येऊ शकते. अर्थसंकल्पपूर्व सूचनांतर्गत गुरुवारी अर्थमंत्री आणि अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांनी औद्योगिक संघटनांची भेट घेतली.
पीएचडी चेंबर, सीआयआय सारख्या औद्योगिक संघटनांनी अर्थमंत्र्यांकडे मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्याच्या धोरणावर भर देण्यास सांगितले जेणेकरून २०३० पर्यंत जीडीपीत मॅन्यूफॅक्चरिंगची भागीदारी २५ टक्केपर्यंत पोहोचावी. सध्या ही भागीदारी १६ टक्के आहे. औद्योगिक संघटनांनी सरकारकडे जमीन, कामगार नियमांमध्ये बदल करण्यासह व्यवसायाशी संबंधीत अनावश्यक नियम हटविण्याची मागणी केली.
पीएचडी चेंबरचे अध्यक्ष संजीव अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही अर्थमंत्र्यांकडे कार्पोरेट टॅक्स २२ टक्के तर एक ऑक्टोबर २०१९ नंतर स्थापन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी १५ टक्के कार्पोरेट टॅक्स दर करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून जीडीपीत मॅन्युफॅक्चरिंगची वाढू शकते. पीएचडी चेंबरने मध्यमवर्गासाठी इन्कम टॅक्सचे दर सुद्धा तर्कसंगत करण्याची मागणी केली आहे.