Sassoon Hospital | ‘ससून’चे काम पारदर्शक होणार? कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे पाऊल

0

पुणे : Sassoon Hospital | कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर (Kalyani Nagar Car Accident Pune) ससून रुग्णालयातील गैरप्रकारही समोर आला. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाला वाचवण्यासाठी ससून मधून सर्वोतपरी मदत झाली. ससूनमधील आपत्कालीन विभागात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल करण्यात आली होती.

या प्रकरणी न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ.अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि आपत्कालीन विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणानंतर एकंदरीत ससूनच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे (Dr Vinayak Kale) यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी डॉ.चंद्रकांत म्हस्के (Dr Chandrakant Mhaske) यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला.

डॉ. म्हस्के यांनी अधिष्ठाता पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर तातडीने आपत्कालीन विभागात सुधारणा करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची समिती नेमली. या समितीने नुकताच आपला अहवाल अधिष्ठात्यांना सादर केला आहे. हा अहवाल ११७ पानांचा आहे. त्यात न्यायवैद्यक प्रकरणांबाबत आपत्कालीन विभागात घ्यावयाच्या उपाययोजना सविस्तरपणे मांडण्यात आल्या आहेत. आपत्कालीन विभागातील डॉक्टरांनी न्यायवैद्यक प्रकरणात कोणत्या पद्धतीने काम करावे, याची नियमावलीही समितीने सूचविली आहे.

न्यायवैद्यक प्रकरणातील व्यक्तींनी ससूनच्या आपत्कालीन विभागात तपासणीसाठी आणले जाते. अशा वेळी तेथील कामकाज अधिक पारदर्शक राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीन विभागात लवकरच अनेक बदल केले जाणार असून, तेथील काम अधिक नियोजनबद्ध करण्यात येणार आहे, असे डॉ.चंद्रकांत म्हस्के यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.