Sharad Pawar NCP | चिंचवड विधानसभे संदर्भात शरद पवार गटाकडून जगताप कुटुंबाला मोठी ऑफर

0

चिंचवड : Sharad Pawar NCP | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झालेली आहे. चिंचवडच्या जागेसाठी (Chinchwad Assembly) घरातच वाद रंगल्याचे चित्र दिसत आहे. शंकर जगताप (Shankar Jagtap) आणि त्यांची वहिनी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Laxman Jagtap) या दीर-भावजय नात्यातच विधानसभेच्या जागेसाठी रस्सीखेच सुरु आहे. (Chinchwad Jagtap Family)

चिंचवड विधानसभेवरून महायुतीत (Mahayuti) कलगीतुरा रंगलेला असताना महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) देखील चिंचवडवरून धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे (Tushar Kamthe) यांनी चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे. पिंपरी (Pimpri Assembly), चिंचवड विधानसभा ही तुतारी चिन्हावरच लढवली जाणार आहे. दोन्ही विधानसभेवर शरद पवार यांची ताकद आहे.

२००९ ते आजतागायत इतिहास पाहिल्यानंतर या मतदारसंघावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मानणारा मतदार असल्याचे मत तुषार कामठे यांनी व्यक्त केल आहे. दरम्यान, कामठे यांनी जगताप कुटुंबीयांवर भाष्य करत अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांसाठी आमच्या पक्षाची दारे नेहमी खुली असतील असं म्हणत कामठे यांनी शंकर जगताप आणि विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

शंकर जगताप आणि अश्विनी लक्ष्मण जगताप या दोघांपैकी एकाला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर दुसरा व्यक्ती काय निर्णय घेणार आणि तो कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन लढणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.