Rohit Pawar | पक्षात नाराज असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले – “प्रदेशाध्यक्ष पदाबाबत इच्छुक…”

0

बारामती : Rohit Pawar | मागील काही दिवसांपासून आमदार रोहित पवार पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सुरु असलेला सुप्तवाद त्याचे नेमके कारण काय आहे याबाबत अनेकजण उत्तराच्या शोधात आहेत. याबाबत आता आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले, ” “मी एखाद्या वेळी नाराज झालो आणि कुठतरी जाऊन दरवाजा बंद करुन बसलो, असं कधी दिसणार नाही. माझ्या स्वभावानुसार माझ्या मनात जे असतं, ते मी बोलून दाखवतो. नगरला जे झालं त्यावेळी मी कोणत्या एका नेत्यावर टीका केली नव्हती. मी पक्षाच्या भूमिकेवर आणि पक्षातील त्रुटींवर बोललो होते. ती माझी एकट्याची भूमिका नव्हती. मी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका तिथे बोलून दाखवली होती”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्याशी मतभेद असल्याच्या चर्चावरही भाष्य केलं. “माझ्या आणि जयंत पाटलांच्या संदर्भात माध्यमात काही बातम्या आल्या. मात्र, त्याठिकाणी माझं आणि जयंत पाटील यांचे भाषण ऐकलं, तर आम्ही दोघांनीही एकच एक भूमिका मांडली होती. हा विजय कोण्या एकट्याच नसून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचा आहे, असं आम्ही सांगितलं होतं, त्यामुळे लोकसभेतील यश हे सर्वसामान्य लोकांचं असून कोणा एकट्याचं नाही”, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना आपण प्रदेशाध्यक्ष पदाबाबत इच्छुक नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. “गेल्या सात वर्षांपासून मी काम करतो आहे. हे काम करताना कार्यकर्ते पदाधिकारी काही भूमिका मांडतात. तेव्हा लवकर निर्यण घेणं महत्वाचं असतं, अनेकांना पक्षांसोबत येण्याची इच्छा असते.

परंतु, माझ्याकडे कोणतही पद नसल्याने मला निर्णय घेता येत नाही. ही भूमिका आम्ही शरद पवार यांच्याकडे मांडली आहे. शिवाय जयंत पाटील सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे माझ्या पदाबाबत जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. भविष्यात कोणतीही जबाबदारी मिळाल्यास मी तयार आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.