Maharashtra Cabinet Expansion | पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मंत्रिपदासाठी आशावादी, तातडीने मुंबईला रवाना

पिंपरी : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी होणार अशा चर्चा रंगलेल्या असताना याबाबतच्या घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. दरम्यान आमदार अण्णा बनसोडे (MLA Anna Bansode) तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर व्हावा जेणेकरून त्या- त्या मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात प्रभाव पाडता येईल. मंत्री पदासाठी स्वतः आशावादी असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णा बनसोडे म्हणाले, मुंबईला बोलावण्याचा निरोप आलेला नाही. मी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटण्यासाठी मुंबईला निघालो आहे. विस्ताराबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही.
पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे मतदारसंघातील काम घेऊन जात असतो. मंत्री मंडळाचा विस्तार पाठीमागेच व्हायला हवा होता. परंतु, लोकसभेचा निकाल पाहिला त्यादृष्टीने मंत्री मंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे जेणेकरून मंत्र्यांच्या त्या- त्या मतदारसंघात प्रभाव पडेल. मंत्री पदासाठी मी नेहमीच आशावादी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून अजित पवारांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.