Murlidhar Mohol | पहिल्यांदाच खासदार अन् थेट मोदींच्या मंत्रिमंडळात, मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ‘या’ 2 खात्याची जबाबदारी

0

पुणे : – Murlidhar Mohol | नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.9) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या मंत्रिमंडळात पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय राज्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे.

पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मोहोळ पहिल्यांदाच खासदार झाले असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी चर्चा होती. अखेर रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज खातेवाटप करण्यात आले. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्य मंत्री आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुरलीधर मोहोळ यांचा अल्पपरिचय

मुरलीधर मोहोळ पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील असून त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. तेथे त्यांनी कुस्तीचे धडे ही घेतले. आरएसएसच्या शाखांमध्ये सहभागी झालेले मोहोळ 2002 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि 2019 मध्ये महापौर झाले. महापौर होण्यापूर्वी ते पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2009 मध्ये पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता.

मोहोळ यांची प्रतिक्रीया

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा भाग होण्याची संधी मला मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला ही संधी दिल्याबद्दल मी भाजप नेतृत्वाचे आभार मानतो असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर आज खातेवाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री, अमित शहा – गृहमंत्री व सहकार मंत्री, नितीन जयराम गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांना यापूर्वी देण्यात आलेली खाती कायम ठेवण्यात आली आहेत. तर जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; आणि रसायने आणि खते याची जबादारी सोपवण्यात आली आहे.

मोदी ३.० मध्ये कोणाला कोणते मंत्रालय?

राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
अमित शहा- गृहमंत्री
एस जयशंकर- परराष्ट्र व्यवहार मंत्री
निर्मला सीतारामण- अर्थ मंत्री
नितिन गडकरी- रस्ते परिवहन आणि महामार्ग विकास मंत्री
चिराग पासवान- क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री
शिवराज सिंह चौहान- कृषी आणि ग्रामीण विकास, पंचायती राज मंत्री
मनोहर लाल खट्टर- आवास आणि ऊर्जा मंत्री
अश्विनी वैष्णव- रेल्वे आणि सूचना व प्रसारण मंत्री
जीतन राम मांझी- MSME मंत्री
राममोहन नायडू- नागरिक उड्डाण (सिविल एविएशन) मंत्री
भूपेंद्र यादव- पर्यावरण मंत्री
गजेंद्र शेखावत- संस्कृती आणि पर्यटन मंत्री
सीआर पाटील – जलशक्ति मंत्री
किरेन रिजिजू- संसदीय कार्य मंत्री
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
एचडी कुमारस्वामी- अवजड उद्योग आणि खाण मंत्री
जेपी नड्डा- आरोग्य मंत्री
प्रह्लाद जोशी- फूड, कंज्यूमर अफेयर आणि रिन्यूएबल एनर्जी मंत्री
हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल कल्याण मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया- टेलीकॉम मंत्री
गिरिराज सिंह- टेक्सटाइल मंत्री
मनसुख मांडविया- श्रम आणि रोजगार मंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.