Ajit Pawar | मंत्रिपदावरून राष्ट्रवादी – भाजपात मतभेद? अजित पवार म्हणाले – ’15 ऑगस्ट पर्यंत…’

0

पुणे: Ajit Pawar | आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन दोन्ही गटाकडून साजरा होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला आहे. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चेला घेऊन अजित पवारांनी भाष्य केले आहे. भाजप आणि आमचे आलबेल असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

अजित पवार म्हणाले, “काल कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम काही लोकं करत होते. आम्ही अनेक जणं काल दिल्लीत होतो. आम्ही सर्वजण सकाळपासून एकत्र चर्चा करायचो. आम्ही प्रफुल्ल भाईंच्या घरीच होतो. आम्ही सर्वजण एकत्र होतो.

कुठेही मतभेद नाहीत. कारण नसताना कधीकधी, मीडियातून आपण फार संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर एखादा शब्दाचा वेगळा अर्थ लावला जातो. नाही संवाद साधला तर आमच्याशी बोलले नाहीत म्हणून ते बोलतात. मग ते पाहिजे त्या बातम्या लावतात. त्यांनी मग काल ती बातमी चालवली”, असं अजित पवार म्हणाले.

“आपले सहकारी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खरं सांगितलं. भाजपने आम्हाला सांगितलं की, तुमची लोकसभेची एकच जागा आलेली आहे. आम्हाला तर तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे. पण मंत्रिपद देत असताना आम्हाला तुम्हाला स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद द्यायचं आहे.

आपला आज राज्यसभेत एक सदस्य आणि लोकसभेत एक सदस्य आहे. साधारण जुलै अखेपर्यंत किंवा १५ ऑगस्टपर्यंत आपल्याला राज्यसभेचे ३ सदस्य झालेले बघायला मिळतील. राज्यसभेत आपली संख्या वाढलेली दिसेल”, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.