Pune Rains | पुण्यात मुसळधार, रस्त्यावर पाणीच-पाणी; पुढील 3 तास सावधानतेचा इशारा

0

पुणे : – Pune Rains | पुणे शहर आणि राज्यात मान्सूनचे आगमन झाल असून विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. कोथरुड परिसरातील ओढ्याला पूर आला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर शहरात 25 ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

शहरात सुरु असलेला मुसळधार पाऊसामुळे अग्निशमन दलाकडे सद्यस्थितीत जवळपास 25 ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली असून उर्वरित झाडपडीची संख्या वाढत आहे. दोन ठिकाणी (पाषाण, सिहंगड रोड) इमारतीचा तळमजल्यावर पाणी साचल्याच्या घटना आहेत. दलाची अग्निशमन वाहने व जवान विविध वर्द्यांवर कर्तव्य बजावत असून कुठे कोणी जखमी वा जिवितहानी नाही झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

पुणे शहरातील पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. तसेच वारजे माळवाडी, कोथरुड या भागासह इतर भागात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पावसामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे.

पुढील पाच दिवस मुसळधार

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदभातील जवळपास सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही आयएमडी कडून वर्तवण्यात आला आहे. 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.