Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : शेअर खरेदीच्या बहाण्याने सॉफ्टवेअर इंजीनियरची 91 लाखांची फसवणूक

8th June 2024

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | राज्यात ऑनलाईन फसवणुकीचे (Online Cheating) अनेक प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणुकीच्या (Cyber Crime Pune) घटना वाढत आहेत. ऑनलाईन फसवणुकीत सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे उच्च शिक्षित लोकही अडकत आहेत. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) एका सॉफ्टवेअर इंजीनियरची फसवणूक केली. शेअर खरेदी करण्यास सांगून 91 लाखांची फसवणूक केली.

याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील 46 वर्षीय सॉफ्टवेअर आर्कीटेक्ट इंजीनियरने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सायबर गुन्हेगारांवर आयपीसी 420, 406, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च ते जून 2024 दरम्यान ऑनलाईन घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इन्फोसिस कंपनीत सॉफ्टवेअर आर्कीटेक्ट इंजीनियर म्हणून काम करतात.

मार्च महिन्यात त्यांच्या फेसबुकवर कॅपुला इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट एलएलपी या कंपनीची जाहिरात प्रसारित केली. आरोपींनी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्यानंतर लिंक पाठवून प्ले स्टोअर मधून मोबाईलमध्ये कॅपल मार्केट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर अॅपवरुन 91 लाख 60 हजार रुपयांचे शेअर खरेदी करण्यास सांगितले. त्यावर मोठा परतावा मिळाला असल्याचे अॅपवर दाखवले. मात्र, फिर्यादी यांना पैसे मिळाले नाहीत. आरोपींनी फिर्यादी यांनी केलेली गुंतवणूक व परतावा परत न करता फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.