Lonikand Pune Crime News | पुणे : रस्त्यात गाडी अडवून दोघांवर कोयत्याने वार, महिलेसह तिघांना अटक

0

पुणे : – Lonikand Pune Crime News | दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार केले (Koyta Attack). तसेच जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याच्या भावावर देखील कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार शुक्रवारी वडगाव शिंदे (Vadgaon Shinde) येथील कॅनरा बँकेच्या जवळ सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत समीर रामदास काकडे (वय-28 रा. वडगाव शिंदे, ता. हवेली) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संदीप प्रल्हाद काकडे , यश संदीप काकडे आणि गिता संदिप काकडे (तिघे रा. वडगाव शिंदे) यांच्यावर आयपीसी 307, 341, 323, 506, 427, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर काकडे त्याचा मित्र रुपेश कदम याच्या दुचाकीवरुन लोहगावला जात होते. कॅनरा बँकेजवळ आरोपींनी त्यांची गाडी अडवली. रुपेश कदम हा फिर्यादी यांच्यासोबत फिरत असल्याचा राग आरोपींच्या मनात होता. ‘तुला सांगितले होते की याच्यासोबत फिरत जाऊ नको, तुम्हाला जीवेच मारतो’ अशी धमकी आरोपींनी दिली. तर यश काकडे याने सोबत आणलेल्या लोखंडी कोयत्याने समीर याच्या मानेवर पाठीमागून वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

जखमी झालेल्या समीरला त्याचा मित्र रुपेश कदम आणि भाऊ दवाखान्यात घेऊन जात होते. त्यावेळी संदिप काकडे याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने भाऊ अमीत काकडे याच्या हातावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच गिता काकडे हिने फिर्यादीच्या बोलेरो गाडीवर दगड मारुन समोरील काच फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.